Mumbai news : स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने तिघांची ६४ लाखांची फसवणूक
मुंबईत सवलतीच्या दरात म्हाडाचा फ्लॅट आणि दुकान मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीने तिघांची ६४ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai news – मुंबईत सवलतीच्या दरात म्हाडाचा फ्लॅट आणि दुकान मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीने तिघांची ६४ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
एका पीडित व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांनी सुर्वणसिंग तुफानसिंग पटियाल ऊर्फ बंटी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला भागात सवलतीच्या दरात फ्लॅट आणि दुकान मिळवून देण्याचे आश्वासन देऊन २०१३ ते २०२५ या कालावधीत तक्रारदार आणि त्यांच्या दोन मित्रांची ६४.१८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
आरोपीने विश्वास संपादन करण्यासाठी पीडितांना बनावट कागदपत्रे दाखवली त्यांच्याकडून पैसे उकळले. पटियालचे म्हाडा किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागात कोणतेही लागेबांधे नव्हते. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.





