Japan : वादळी हिमवृष्टीमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू; 90 हून अधिक….

टोक्यो – अमेरिकेनंतर आता जपानमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. येथे झालेल्या वादळी हिमवृष्टीमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक घरांची वीजही गेली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जपानच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे उत्तरेकडील भागातील महामार्गांवर बर्फवृष्टीत वाहने अडकली.
अधिका-यांचे म्हणणे आहे की, छतावरील बर्फ साफ करताना, लोक छतावरून खाली पडून अनेक मृत्यू झाले. अशा परिस्थितीत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Pakistan : पाकिस्तानातील माजी मंत्र्याच्या मुलाला ‘या’ प्रकरणी फाशीची शिक्षा
त्याचवेळी, बर्फवृष्टीमुळे ईशान्य जपानमधील सुमारे 20 हजार घरांमधील वीज गेली आहे. सरासरीपेक्षा तिप्पट बर्फवृष्टी झाली आहे. याशिवाय, उत्तर जपानमध्ये डझनभर रेल्वे आणि उड्डाणेही प्रभावित झाली आहेत.





