Mangaluru Acid Attack: काॅलेजमधील तीन विद्यार्थीनींवर माथेफिरूने फेकले ॲसिड
Updated On:

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील मंगळुरू येथे सोमवारी एका माथेफिरू व्यक्तीने तीन महाविद्यालयीन मुलींवर ॲसिड (Mangaluru Acid Attack ) फेकण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा मुली कॉलेज कॅम्पसमध्ये बसल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हल्लेखोर 23 वर्षांचा असून तो केरळचा रहिवासी आहे. पीडितांपैकी एक मुलगी १७ वर्षांची असून ती केरळची असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे, तर तिच्या शेजारी बसलेल्या इतर दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. कोणत्या कारणासाठी त्याने हा अघोरी प्रकार केला त्याची माहिती अजून समोर आलेली नाही. पीडित मुलींचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे, असे पेालिसांनी सांगितले.





