राजगुरूनगर लोकअदालतीत तीन कोटी रुपयांची वसुली

राजगुरूनगर – येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 176 खटले तडजोडीतून मिटवण्यात आले. या लोकअदालतमध्ये तब्बल 3 कोटी 15 लाख 97 हजार 912 रुपयांची वसुली झाली आहे.

राजगुरूनगर येथील न्यायालयात नुकतेच लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन न्यायाधीश एन. के. बह्मे यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायाधीश ए. एम. अंबळकर, एस. एन. पाटील, जी. बी. देशमुख, के. एच. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश डी. बी. पतंगे, पी. डी. देवरे, एस. एस. पाखले, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष कड, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. पोपटराव तांबे, ऍड. अरुण मुळूक, ऍड. सुलभा कोटबागी, ऍड. गोरक्षनाथ शिंदे, ऍड. आदिनाथ कड, ऍड. संदीप मलघे, ऍड. संदीप घुले यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, विविध विभागाचे अधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील न्यायालयातील न्यायाधीशांसह ऍड. वैभव कर्वे, ऍड. जना पुंडे, ऍड. देविदास शिंदे, ऍड. माणिक वायाळ, ऍड. अमोल घुमटकर, ऍड. सविता काळे, ऍड. संतोष माळी, ऍड. रेश्‍मा भोर, ऍड. अतिक सय्यद, ऍड. सरिता काजळे या बार असोशिएशनच्या सदस्यांनी पॅनेल जज म्हणून काम पहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.