ऊसतोड कामगारांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु
Updated On:

बीड – ऊसतोडीच्या कामासाठी आलेला कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे घडली. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणूका अंकुश जाधव आणि अजय बाळू जाधव अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. हे तिघेही मूळचे परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथील रहिवासी आहे.
मोहोळ येथे त्यांचे कुटुंबीय ऊस तोडीला आल्याने ते त्यांच्यासह आले होते. घरातील सदस्य ऊस तोडीच्या कामासाठी गेल्यानंतर मयत दोन मुली आणि एक मुलगा असे तिघे काल दुपारी आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने आष्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





