कोरेगाव मतदारसंघात NCP कार्यकर्त्यांना धमक्या; आ. शिंदेंकडून कारावाईची मागणी

Updated On:

पुसेगाव – सत्य ज्यावेळी समोर येतं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न झाला की त्याला दाबण्याचा प्रयत्न सध्या कोरेगाव मतदारसंघात सत्तेच्या मस्तीत असलेले लोक करत आहेत. त्यांना लोकांनी काम करण्याची संधी दिली म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही. परंतु, त्या संधीचा उपयोग जनहितासाठी करण्यापेक्षा त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्ता, विरोधक अशा अनेकांना आपल्या अधिकारातून धमकाविण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त डोर्लेवाडीत रंगली “कबड्डी स्पर्धा”

पत्रकार परिषदेतून आमच्यावर आरोप केले, खरं म्हटलं तर त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून साहजिकच माझ्या सहकाऱ्यांनी आरोप केल्यामुळे चिडून जाऊन रात्री विद्यमान आमदाराने सोशल मीडिया अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा दिला. हे कुठेतरी झाकण्यासाठी व्हाँट्सअँपद्वारे कॉल करून हा सगळा प्रताप त्यांनी केला, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केला .

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त डोर्लेवाडीत रंगली “कबड्डी स्पर्धा”

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, ”ज्यांनी त्यांच्याविरोधात जाण्याचा प्रयत्न केला अशा सगळ्यांना त्यांनी आणि त्यांच्या भगिनींनी धमकी आणि इशारा देण्याचा प्रयत्न केला. आजवर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो. परंतु, रमेश उबाळे, प्रताप बोधे, निलेश कदम, सागर बर्गे, सूरज देवकर, साहिल शेख, वैभव पवार आणि अशा अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, तरुण सहकाऱ्यांना अशाप्रकारे धमकी देणे चुकीचे आहे. माझ्यावर आजवर अनेक प्रकारच्या जहालपणे बातम्या छापल्या पण मी कधी कोणाला धमकी किंवा प्रत्युत्तर केलं नाही.

लोकशाहीने प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्याने पूर्णपणे वापरावा. लोकांना पटलं तर लोक स्वीकारतील. परंतु यापुढे जरा अशा प्रकारची भाषा लोकप्रतिनिधी वापरत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.” याबाबत माझ्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी पोलीस चौकशीसाठी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी चौकशी करून या बाबतीत समज द्यावी, कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. पोलिसांनी लक्ष घातले नाही किंवा कुठेतरी सत्तेच्या मस्तीला आळा घातला नाही तर आम्हाला जशास तसे उत्तर द्यायला आम्हीसुद्धा समर्थ आहोत, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.

दिवसेंदिवस सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून वाढत असल्याने विरोधक म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरून मोर्चा काढावा लागेल. कार्यकर्ता हा आपल्यावर अवलंबून असतो. तो व्यवसायाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार असतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी शिफारस करत असतो. शेवटी शासनाच्या निकषात काम योग्य प्रकारे झाल्यावर तपासणीसाठी यंत्रणा असते. परंतु इथे यंत्रणा, क्वालिटी चौकशी, बाकी सगळे व्यवहार आमदारच करतो असा आमचा थेट आरोप आहे. चुकीचे काम करण्याबाबत आम्ही कधीही समर्थन केलेलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार म्हणून काम करण्याच्या संधीचा उपयोग जनहितासाठी करण्यापेक्षा वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्ता, विरोधक अनेकांना धमकाविण्यासाठी केला जात आहे. सत्य ज्यावेळी समोर येतं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न झाला की त्याला दाबण्याचा प्रयत्न सध्या मतदारसंघात सत्तेच्या मस्तीत असलेले लोक करत आहेत. सोशल मीडिया अध्यक्षांच्या झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी लक्ष घातले नाही किंवा कुठेतरी सत्तेच्या मस्तीला आळा घातला गेला नाही तर आम्ही जशास तसे उत्तर द्यायला समर्थ आहोत.

आणखी संबंधित बातम्या

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा

2026-09-27 17:28:54

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

2026-09-26 18:42:55

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य

2026-09-26 18:17:07

Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य