इस्लामाबाद : तुरूंगात आपल्या जिवाला धोका असल्याचे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. आपले जर तुरूंगात काही बरेवाईट झाले तर त्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांना दोषी मानले जावे असे इम्रान यांनी सांगितले आहे.
आपल्याला आदियाला तुरूंगात अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले आहे. माझ्या तुरूंगाशी संबंधित सगळ्या प्रशासकीय बाबींवर आयएसआयचे नियंत्रण आहे. त्यामुळेच मी याचा पुनरूच्चार करतो जर माझ्या जिवाला काही धोका झाला तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि आयएसआयचे डायरेक्टर जनरल हेच त्यासाठी जबाबदार असतील असे इम्रान यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पत्नी बुशरा बीबी यांच्या सुरक्षेबाबतही त्यांंनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या खोलीत उंदरे फिरत असतात. यावेळी पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या कामगिरीबद्दलही भाष्य करताना त्यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना लक्ष्य केले. त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटचा सत्यानाश केल्याचा आरोप नकवींवर केला.