Amit Thackeray on Ajit Pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार पक्षाचे 42 आमदार कसे निवडून आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आले नाही, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावला. यावर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कामगार नगर प्रीमियर लीग 2025च्या कार्यक्रमाला अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले “अजित पवारांवर बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. यावर राज ठाकरेच उत्तर देऊ शकतील. पण मी पराभूत झालो असलो तरी खचलो नाही. यश अपयश येत असतं, आमच्याही आयुष्यात ते आले. या निवडणुकीतून मी खूप शिकलो. मी एवढेच सांगेन की, माझ्या पहिल्या निवडणुकीवरून नाही तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करा.” Amit Thackeray on Ajit Pawar |
अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
“राज ठाकरे यांनी त्यांना जे काय वाटते, ते म्हटले. त्याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. जनतेने आम्हाला निवडून दिले. त्यांनी निवडणूक निकालावर वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस 17 जागाच मिळाल्या, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाहीत की, आमची एक जागा आली. यावेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत केली होती. म्हणून आमचे आमदार निवडून आले. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता”, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावला होता.
‘बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या’
“पुढच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणूक होईल ही आशा आहे. बॅलेट पेपर हे बेटर आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. आम्ही याच मतांवर ठाम आहोत. निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा नसेल तर हेच रिझल्ट तुम्हाला दिसतील. ईव्हीएमवर किती विश्वास आहे माहिती नाही. माझ्याकडे पुरावा नाही. राज ठाकरे याच्यावर स्पष्ट बोलतील. निकाल जो येतोय, तो अनपेक्षित असाच आहे”, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली.
महापालिका निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महापालिका निवडणुकीची आमची तयारी सुरू आहे. मार्चपासून मी दौरे करणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये नक्कीच बदल होईल. बदल होण्याची गरज आहे. मी आत्मपरीक्षण करत होतो. तेव्हा काय चुका झाल्या हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी तसा अहवाल राज ठाकरे यांना देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“अजित पवारांचे 42 आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असे सगळ्यांना वाटत होते. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जीवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त 10 जागा मिळाल्या? हे सर्व न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी मेळाव्यातून केली होती. Amit Thackeray on Ajit Pawar |
हेही वाचा: