“नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात”; अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी टीका करताना त्यांचा ‘चंपा’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीतील चौकीदारचे लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचे लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं, नंतर कोथरूड शोधावे लागले. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात,’ अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर केली हे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल पाटील यांनी अजित पवारांना केला होता.





