जे पत्नीला न्याय देऊ शकत नाही, ते तुम्हाला काय न्याय देतील?- प्रकाश आंबेडकर
Updated On:

भंडारा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा एकमेकांवर टीकांचा भडीमार सुरु आहे. दरम्यान, भंडारा येथील प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ”जो व्यक्ती पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय न्याय देईल?” अशी टीका मोदींवर केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, जो स्वतःच्या कुटुंबाला न्याय देऊ शकतो. तो देशाला न्याय देऊ शकतो. मात्र जो पत्निची इज्जत करत नसेल, तो आपल्याला काय न्याय देईल, असा टोला आंबेडकरांनी मोदींना लगावला.
प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीलाही टोले लगावले,”आम्ही उमेदवार लढवले म्हणून शरद पवार आणि प्रफुल पटेलांनी माघार घेतली”, असे ते म्हणाले.





