रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मिळणार कॅशलेस उपचार’; नितीन गडकरींची घोषणा

Nitin Gadkari | रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार असल्याची माहिती दिली आहे. याअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे.
अपघातानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. यामुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना मोठी मदत होणार आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, “काही राज्यांमध्ये कॅशलेस उपचार हा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आला होता. आता त्यातील सर्व त्रुटी दूर करून त्याची पुन्हा अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा फायदा पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. तर हिट अँड रन प्रकरणात एखाद्याचा मृत्यू झाल्यास सरकार दोन लाख रुपये देईल.” मंगळवारी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर नितीन गडकरी यांनी यांसदर्भात माहिती दिली. Nitin Gadkari |
#WATCH | CORRECTION | Union Minister of Road Transport & Highways, Nitin Gadkari says “In the meeting, the first priority was for road safety – 1.80 lakh deaths have occurred in 2024. 30,000* people died because of not wearing a helmet. The second serious thing is that 66%* of… pic.twitter.com/Xsh1Q04VXn
— ANI (@ANI) January 8, 2025
याशिवाय सरकार ई-रिक्षांसाठी सेफ्टी स्टार रेटिंग लागू करण्याचा विचार करत आहे. व्यावसायिक वाहने, विशेषत: जड वाहनांचा समावेश असलेल्या वाहनांपासून अपघात टाळण्यासाठी ड्रायव्हर झोपी गेल्यास सरकार आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम आणि ऑडिओ-ॲलर्ट यंत्रणेवर काम करेल. ट्रक आणि बसेसनाही हे लागू होईल, सरकारचे सर्वोच्च प्राधान्य रस्ते सुरक्षा असल्याचेही ते म्हणाले. Nitin Gadkari |
2024 वर्षात अपघातात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी
तसेच, २०२४ मध्ये रस्ते अपघातात जवळपास १.८० लाख लोकांनी आपला जीव गमावल्याची चिंताजनक आकडेवारी त्यांनी सांगितले. याशिवाय, ३० हजार लोकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाला आहे. ६६ टक्के अपघात हे १८ ते ३४ वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, सिग्नलचे पालन न करणे यासारख्या रस्त्यांच्या नियमांमुळे लोकांना जीव गमवावा लागले आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा :





