Pune : सुरेश वाडकर यांना यंदाचा पंचमरत्न पुरस्कार
Updated On:

पुणे : पद्मश्री सुरेश वाडकर यांना “पंचमरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन (पंचमदा) यांचे चाहते असलेल्या पुण्यातील कलावंतांच्या समूहातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत दि. ४ जानेवारी रोजी आयोजित “री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ६ वाजता होईल. यानिमित्त सांगीतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ असे ‘पंचमरत्न’ या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार कर्सी लॉर्ड, मनोहरी सिंघ (मनोहरीदा), शैलेंद्र सिंग, तौफिक कुरेशी, नितीन शंकर अशा पंचमदां सोबत काम केलेल्या अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.





