मनसेच्या ‘या’ नेत्याचे युतीबाबत सूचक संकेत; ‘त्या’ फोटो अन् कॅप्शनमुळे चर्चांना उधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?

Sandeep Deshpande | Hell to Heaven book | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धराला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील नेत्याने याबाबतचे एक सूचक संकेत दिला आहेत. मनसेतील पहिल्या फळतील नेते म्हणून ओळख असलेल्या संदिप देशपांडे यांनी युतीस सकारात्कता दर्शवली आहे. यामुळे आता शिवसेना-मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
संदिप देशपांडे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांनी अनेकदा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पण त्यांनी त्यांच्या एक्सवरून एक फोटो शेअर आणि त्यासोबत शेअर केलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या पोस्टमध्ये संदिप देशपांडे संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक वाचताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात लपण्यासारखे काही नाही असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
…म्हणून मी तसे कॅप्शन लिहिलेले
नेमके पुस्तकात काय आहे? ते वाचेल आणि अभिप्राय कळवेल. मी पुस्तक वाचतोय यात लपून वाचण्यासारखे काय कारण? म्हणून मी तसे कॅप्शन लिहिलेले आहे, असे संदिप देशपांडे यांनी स्पष्ट केले. तसेच पुस्तक विकत घेऊन वाचले तर खरा अभिप्राय देता येतो. जर पुस्तक भेट म्हणून आले तर खरं बोलता येत नाही, असेही ते म्हणाले.
लपवण्यासारखे काहि नाही… pic.twitter.com/KUjIduAwgU
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 5, 2025
शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहेत. शिवसेनेच्या वतीने आम्ही सकारात्मक आहोत, असे सांगितले जात आहे. यावर बोलताना संदिप देशपांडे म्हणाले, रोज-रोज आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत, असे बोलून काय होत नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल, तेव्हा राज साहेब निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा





