ये पब्लिक है सब जानती है; आलिया बोलून गेली, पण चाहत्यांनी आठवण करून दिली!

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. या प्रोजेक्ट्सवर ती मेहनत घेत आहे. आलियाचा YRF स्पाय युनिव्हर्स अल्फा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे ती चर्चेत असून एक व्हिडीओ शेअर करत आलियाने या चित्रपटाला तिचा पहिला अॅक्शन चित्रपट म्हटले आहे, ज्यामुळे सोशल मीडिया नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी तिला तिच्या जुन्या चित्रपटांची आठवण करून दिली आहे.
नुकतीच आलियाने मिलान फॅशन वीकमध्ये हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिथे ती एका जागतिक ब्रँडची अॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाली होती. शो दरम्यान, आलिया भटने तिच्या आगामी ‘अल्फा’ चित्रपटाबद्दल माहिती दिली. ‘अल्फा’ हा तिचा पहिला अॅक्शन चित्रपट असल्याचे तिने या व्हिडीओत म्हटले आहे. यानंतर चाहत्यांनी तिला तिच्याच जुन्या चित्रपटांची आठवण करून दिली. यामुळे अल्फा हा तिचा पहिला अॅक्शन चित्रपट कसा असू शकतो असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाली आलिया?
“वाह, हा चित्रपट खूप जवळचा आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण हा माझा पहिलाच अॅक्शन-अॅडव्हेंचर प्रोजेक्ट आहे आणि प्रेक्षक त्याच्याशी कसे जोडले जातात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.” अशी प्रतिक्रिया आलियाने या अल्फा चित्रपटाविषयी बोलताना दिली. आलियाच्या या विधानावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अनेक नेटिझन्सनी असे निदर्शनास आणून दिले की आलियाने झिग्रा आणि हार्ट ऑफ स्टोन मध्ये अॅक्शन सीन्स केले आहेत. त्यामुळे अल्फा हा तिचा पहिलाच अॅक्शन चित्रपट आहे असे म्हणणे योग्य होणार आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “बहुतेक झिग्रा अॅक्शन आधारित होता… दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तिने हे का मान्य केले की तिचे शेवटचे दोन चित्रपट अॅक्शन होते, जेव्हा दोन्ही बॉक्स ऑफिसवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर फ्लॉप झाले होते? अशा काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
हेही वाचा : अमेरिकेतून आली आनंदाची बातमी ; ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या होणार भेट?





