“भाजपचे षडयंत्र.. बाळासाहेबांची शिवसेना..” आमदार अपात्रता निकालावर संजय राऊतांची आक्रमक प्रतिक्रिया

Shivsena MLA Disqualification Result : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर आज जाहीर केला.अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत हे स्पष्ट झालं.त्यानंतर आता ठाकरे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत आक्रमक प्रतिक्रिया देत नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असल्यास म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी ६० वर्षांपूर्वी स्थापन झाली,आज नार्वेकरांनी ज्यांना मालक केलं आहे त्यांचा जन्म देखील त्यावेळी झाला नव्हता. भाजपचे हे षडयंत्र आहे. शिवसेना अशी संपणार नाही. शिवसेना महाराष्ट्राच्या रक्तात आहे. हा न्याय नाही हे षडयंत्र आहे. न्यायालयात आमची लढाई सुरु राहील अशी आक्रमक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
या अध्यक्षांना एक संधी होती इतिहास निर्माण करण्याची. या व्यक्तीने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल असं देखील राऊत नार्वेकरांनी दिलेलय निर्णयाबाबत म्हणाले.
साथ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली तीच भविष्य भाजपने दिल्लीतून नेमलेला व्यक्ती ठरवणार का ? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मातीमोल करण हा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निणर्य काय आहे. गोगावलेंचा व्हीप न्यायालयाने मान्य केला होता अशी आठवण देखील संजय राऊत यांनी आईवेळी करून दिली.





