ही तर धोक्याची घंटा ! किशोरवयीन मुलांमध्ये कॅफेनचा वाढता वापर

अमेरिकेतील 18 टक्के किशोरवयीन मुले जागे राहण्यासाठी कॅफेन पेयाचा वापर करीत असल्याचे अभ्यासात दिसून आलेले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या वतीने या संदर्भातील सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यात आलेला आहेय त्यामध्ये सुमारे 25% पालकांनी असे सांगितले आहे, की त्यांची मुले साधारणपणे रोजच कॅफेनचे सेवन करतात. मुलांच्या कॅफेन सेवनावर मर्यादा घालावी यासाठी पालक नेहमीच जागरूक असतातच असे नाही, असे या अहवाला सूचित करण्यात आलेले आहे.
यासाठी फेब्रुवारी महिन्यात सुमारे 1095 किशोरवयीन मुलांच्या पालकांची सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पालकांनी असे म्हटले आहे, की किशोरवयीन मुले प्रामुख्याने सोडा पितात. ज्यामध्ये 73% कॅफेन असते. त्यानंतर चहामध्ये 32% कॅफेन असते, तर कॉफीमध्ये 31 टक्के कॅफेन असते. अन्य एनर्जी ड्रिंक्स मध्ये साधारणपणे 22 टक्के कॅफेन असते. मुले दिवसभरात या पेयांचे अनेकदा सेवन करतात. पालकांनी असे म्हटले आहे की त्यांची मुले साधारणपणे घरात 80% कॅफेनचे सेवन करतात आणि बाहेर जेवायला गेल्यावर 43% कॅफेनचे सेवन करतात. अन्य वेळी म्हणजे मित्रांबरोबर किंवा शाळेत मुलांकडून 25% कॅफेनचे सेवन केले जाते.
कॅफेन हा एक प्रकारचा अमली पदार्थ असून त्यामुळे मेंदू आणि मज्जा संस्था उत्तेजित होण्यास मदत होते. मात्र सातत्याने कॅफेनचे सेवन करत राहिल्यास तरुण वयात अनेक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, असे या सर्वेक्षणाच्या सहसंचालक आणि बालरोग तज्ञ सुझान वुडफोर्ड यांनी म्हटले आहे. दी अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या संस्थेने मुलांना आणि त्यांच्या पालकांना कॅफेच्या सेवनाबाबत सल्ला दिलेला आहे. किशोरवयीन मुलांनी कॅफेन सेवनापासून लांब राहावे आणि प्रौढांनी दिवसभरात जास्तीत जास्त शंभर मिलिग्रॅम कॅफेनचे सेवन केले तर चालू शकते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात सात टक्के पालकांनी असे म्हटले आहे, की कॅफेनच्या जास्त सेवनामुळे काय धोके आरोग्याला निर्माण होऊ शकतात, याबाबत त्यांनी अनेकदा ऐकलेले आहे मात्र मुलांसाठी पेय खरेदी करण्यापूर्वी त्यातील कॅफेनच्या पातळीबाबत पालक फारसा विचार करत नसल्याचे पालकांनीच कबूल केलेले आहे.





