यंदा साधेपणाने जोपासली वैभवशाली परंपरा
Updated On:

पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं, की वैभवशाली मिरवणुका, नेत्रदीपक देखावे आणि हर्षोल्हासी वातावरण अशी परंपरा आहे. पण, यंदा करोनामुळे हा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्वच गणेश मंडळांनी पाळले आहे. अत्यंत साधेपणाने आणि कोणताही डामडौल न करता गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. पूजा, आरती आणि नैवेद्य आणि प्रार्थना वगळता अन्य सर्व उपक्रमांचे आयोजन यावर्षी करण्यात आलेले नाही. अशाच काही मंडळांच्या बाप्पांच्या मूर्तींचे दर्शन खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…











