हा जीआर फक्त मराठवाड्यापुरताच मर्यादित; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा खुलासा

नागपूर : नागपूर मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचे नियोजित षडयंत्र आहे. 2 सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. मराठवाड्याबाहेरचा हा जीआर लागू होणार नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.तसेच प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला होता. या जीआरचा कोणीच दुरुपयोग करणार नाही. जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचे आरक्षण गेले. त्यावेळी मंत्रीमंडळात विजय वडेट्टीवार होते. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिले. सत्तेत असताना काही करायचं नाही आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा. ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे वचन शिष्टमंडळाला दिले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजचं हित आमचं सरकार जाऊ देणार नाही. हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे. केवळ मराठवाड्यापुत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे, असे ते म्हणाले.





