मुंबई : प्रत्येक माणसाची स्वतःची एक वेगळी कथा असते. तो आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य दाखवत असला तरी त्याच्या मनात कुठेतरी दुःख असते. आपण आज अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने आयुष्यात खूप दुःख सोसलं असलं तरी तिच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं. लहानपणापासून या अभिनेत्रीनं खूप संकटं झेलली पण तरीही ती खूप सुखी असल्याचं दिसतं. तिच्या वैयत्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. चला तर या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से जाणून घेऊयात… या अभिनेत्रीचे नाव आहे रेखा. रेखाने आजवर अनेक सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण रेखाचं आयुष्य तितकं सोपं नव्हतं. भानुरेखा गणेशन असं रेखाचं खरं नाव असून तिचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी एका मद्रासी कुटुंबात झाला. भानुरेखा यांना रेखा या नावानेच ओळख मिळवली. तिचे वडील दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते जेमिनी गणेशन होते, जे ज्युनियर कलाकार पुष्पावलीवर प्रेम करत होते. रेखाचा जन्म लग्नाशिवाय झाला होता. त्यामुळे रेखाला वडिलांचे प्रेम कधी मिळालंच नाही. रेखाला खऱ्या आयुष्यातही प्रेम मिळालं नाही. तिच्या नवऱ्यानं लग्नानंतर काही दिवसातच आत्महत्या करत आयुष्य संपवलं. तसंच रेखाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं, पण त्यांचं अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं अफेअर सर्वात जास्त गाजलं. त्यानंतर रेखानं एकटं राहणंच स्वीकारलं आणि आजही ती तेच जीवन जगत आहे.रेखाने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक शॉकिंग खुलासा केला आहे. आपण दुःखात दारू प्यायचो असा खुलासा केला होता. ‘मी खूप जास्त दारू प्यायचे, ड्रग्जही घ्यायचे. नरकात असल्यासारखं जगतेय… पण मला कोणी विचारलं का की मी असं का करतेय? आयुष्यात मला काय मिळालंय आणि काय नाही?’ असा खुलासा रेखाने केला होता.