इस्रायलमधील युद्धात अडकली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; चित्रपटातील कथा खरी ठरली

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. हमासच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये पॅलेस्टाईनमधील 198 जण ठार झाले आहेत. तर तब्बल 1,610 जण जखमी झाले आहेत, असे गाझामधील पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायलच्यावतीने गाझा पट्ट्यातून डागलेले तब्बल 2,500 रॉकेट पाडण्यात आले. या युद्दादरम्यान अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या टीममधील एका सदस्याने याबाबतची माहिती दिली आहे.
नुसरतच्या टीममधील सदस्याने माध्यमांना सांगितले की, नुसरत हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी इस्रायलमध्ये गेली होती. मात्र आता ती तिथे अडकली आहे. शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास तिचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी ती एका तळघरात सुरक्षित होती. मात्र त्यानंतर तिचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. मात्र तिला भारतात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नुसरतच्या टीमने सांगितले आहे.
मात्र नुकतेच नुसरतच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुसरत आता इस्राइलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर पोहोचली आहे. लवकरच ती विमानाने इस्राइलमधुन रवाना होणार असल्याचे म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मागील वर्षी ऑगस्टमध्ये नुसरत भरुचाचा ‘अकेली’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट युद्धाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एकाकी मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे. मात्र या चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यात नुसरतसोबत घडेल असल्याचे या घटनेतून समोर येत आहे.





