करोना उपचारात प्रभावी ठरलेल्या ‘या’ औषधाला आता भारतातही परवानगी

Updated On:

नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर “डेक्‍सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालया -कडून करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत.

मेथाइलप्रड्‌न् निसोलोनला पर्याय म्हणून डेक्‍सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. करोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांवर डेक्‍सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.

सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्‍सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्‍सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, ऍलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सर -मध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध करोनावरसुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्‍सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. करोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा डब्ल्यूएचओने सल्ला दिला होता.

डेक्‍सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे.

या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. करोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्‍सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्‍सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे औषध स्वस्तात उपलब्ध होते.

आणखी संबंधित बातम्या

Sheikh Hasina: भारतात राहणाऱ्या शेख हसीना यांची मोठी घोषणा, 'या' दिवशी मायदेशी परतणार

2026-07-10 15:02:16

Sheikh Hasina: भारतात राहणाऱ्या शेख हसीना यांची मोठी घोषणा, 'या' दिवशी मायदेशी परतणार

Russian Refineries: युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाच्या रिफायनरीज ठप्प ; भारतावरही होणार परिणाम ? ,वाचा

2026-07-09 12:52:46

Russian Refineries: युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाच्या रिफायनरीज ठप्प ; भारतावरही होणार परिणाम ? ,वाचा

Donald Trump: इराणवरील हल्ल्यादरम्यान ट्रम्पकडून पुन्हा भारत-पाक युद्धाचा उल्लेख ; म्हणाले,'लाख लोकांचे प्राण ...'

2026-07-09 11:26:30

Donald Trump: इराणवरील हल्ल्यादरम्यान ट्रम्पकडून पुन्हा भारत-पाक युद्धाचा उल्लेख ; म्हणाले,'लाख लोकांचे प्राण ...'

E20 E25 E85 Fuel: E20 पेट्रोल विसरा, सरकार E25, E30 अन् E85 इंधन आणणार ;  वाचा सरकारची ही योजना नेमकी काय आहे ?

2026-07-08 12:01:27

E20 E25 E85 Fuel: E20 पेट्रोल विसरा, सरकार E25, E30 अन् E85 इंधन आणणार ;  वाचा सरकारची ही योजना नेमकी काय आहे ?

PM Modi's Indonesia Visit : भारत इंडोनेशियाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे

2026-07-07 19:57:58

PM Modi's Indonesia Visit : भारत इंडोनेशियाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे