Suraj Chavan post : सहजीवनात आली ही स्वप्नसुंदरी? गुलीगत सूरज चव्हाणने शेअर केला ‘ती’च्यासोबतचा खास फोटो

Suraj Chavan post : महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला बिग बॅास मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण हा कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. बिग बॅास मराठीच्या पाचव्या सीजनचा विनर ठरल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेकडून त्याच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव करण्यात आला. या खेळात त्याने सर्वांचीच मनं जिंकली. वैयक्तिक आयुष्यावर बोलताना सूरजने अनेकदा त्याच्या प्रेमभंगाविषयी भाष्य केलं आहे. आता त्याने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा होत आहे. या फोटोमुळे त्याच्या आयुष्यात प्रेम परतलं आहे की काय? असं बोललं जात आहे.
सूरज नेहमी त्याच्या प्रेमिकेचा उल्लेख ‘पिल्लू’ असा करायचा, याशिवाय त्याने सोशल मीडियावर एक रील शेअर केला होता. या रीलमुळे त्याचं ठरलं असल्याची चर्चा सुरू होती. पण तसं काही नव्हतं. मात्र, आता त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. या फोटोत सूरज साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या बाजूला एक मुलगी उभी आहे, तिचाही लूक तसाच आहे, पण तिने चेहऱ्यावर हात ठेवल्याने ती नेमकी कोण आहे हे समजंत नाहिये. या फोटोवर चाहते कमेंट्स करून सूरजचं अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
सूरजने या पोस्टसाठी हार्ट इमोजीचे कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, बिग बॅास मराठी सीझन पाच संपल्यानंतर सूरज चव्हाण एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानेच तयार केलेल्या झापुक झुपूक या शब्दांवर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापूक झुपूक नावाचा मराठी सिनेमा तयार केला. पण हा सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर फ्लाॅप ठरला. या सिनेमाला अपयश मिळाले असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरज चव्हाण त्याच्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असतो.





