Kunal Kamra : ‘हा देश अंबानीच्या बापाचा नाही’; महादेवी हत्तीणीला परत पाठवा: कुणाल कामराचं ट्वीट चर्चेत
Kunal Kamra : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी अर्फ ‘माधुरी’ हत्तीणीची रवानगी गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात करण्यात आली आहे. यानंतर आता नांदणीतील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. गावातील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. अशातच या प्रकरणावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
हे केंद्र रिलायन्स ग्रृपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हे चालवतात. कामराने थेट अंबानीला लक्ष करत ट्वीट केलं आहे. हा देश अंबानीच्या मुलाच्या बापाचा नाही, माधुरी/महादेवी हत्तीणीला कोल्हापूरला परत पाठवा, अशी मागणी त्याने केली आहे. मात्र, अंबानीच्या मुलावर केलेल्या विधानामुळे तो पुन्हा वादात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुणाल कामराने याआधीही आपल्या शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून टीका केली होती. यानंतर तो चर्चेत आला होता. अशातच आता पुन्हा एकदा महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी करताना त्याने थेट अंबानींच्या मुलावर टीका केली आहे.
Yeh desh Ambani ke bete ke baap ka nahi hai.
Return Madhuri/Mahadevi to Kolhapur… pic.twitter.com/kD5SjIoCER— Kunal Kamra (@kunalkamra88) August 2, 2025
या प्रकरणावरून अनेक जण आपल्या भावना व्यक्त करत आहेत. नांदणी गावातील ग्रामस्थांनी जीओचे सीमकार्ड पोर्ट केले आहे. नुकतीच या संर्वधन केंद्राच्या सीओईंनी गावाला भेट दिली होती. त्यानंतर आता गावातील ग्रामस्थांकडून हत्तीणीला परत आणण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. गावात स्वाक्षरी मोहिम देखील राबविण्यात आली होती. या मोहिमेला उत्स्फुर्ते प्रतिसाद देखील मिळाला आहे.
….त्यानुसार रवानगी
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची भव्य मिरवणूक काढत तिला निरोप देण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. या मिरवणुकीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हत्तीणीची रवानगी वनतारा येथे करण्यात आली.





