Actress Divya Dutta : या अभिनेत्रीची टॅालिवूडमध्ये एन्ट्री! मायासभा वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज

Actress Divya Dutta : बॅालिवूड इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक कलाकार इतर भाषिक चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळतात. अनेक बड्या कलाकारांनी इतर भाषिक चित्रपटात काम केले असून त्यांचा चाहतावर्ग तिथेही आहे. बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री एका तेलुगू वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्रीचे नाव दिव्या दत्ता आहे.
दिव्याने आता टॅालिवूड सिनेमाइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. तिच्या आगामी तेलुगू वेब सीरिज ‘मायासभा’ चा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर अभिनेत्री दिव्या दत्ता आता तेलुगू मनोरंजन जगातही आपलं अभिनयाची जादू प्रेक्षकांवर करण्यासाठी सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
दिव्या दत्ताने गुरुवारी तिच्या आगामी तेलुगू वेब सीरिज ‘मायासभा’ चा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहे. हा ट्रेलर शेअर करताना दिव्या दत्ताने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘राज्याचे भाग्य बदलणारी एक कहाणी.’ असं कॅप्शन दिले आहे.
पीटीआयशी बोलताना दिव्या दत्ता म्हणाली, “पहिली वेळ नेहमीच खास असते आणि मला बऱ्याच काळापासून तेलुगू चित्रपटाचा भाग व्हायचे होते. बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटांमधील वाढत्या तालमेलमुळे मला या शोपासून सुरुवात करताना अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. यासोबतच तिने ही वेबसिरीज खूप अद्भुत असणार आहे असे सांगितले.





