“वायसीएम’मध्ये मानधन तत्त्वावर तेरा वैद्यकीय अधिकारी 

पिंपरी  – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात तातडीक सेवा विभागासाठी पाच वैद्यकीय अधिकारी (सी.एम.ओ.) आणि आठ वैद्यकीय अधिकारी (पाळीनिहाय कामकाज तत्त्वावर) तात्पुरत्या स्वरूपात दरमहा एकत्रित मानधनावर घेण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी ही नेमणूक असणार आहे.

एमबीबीएस पदवी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र कौन्सिलकडील नोंदणी बंधनकारक अशी शैक्षणिक पात्रता संबंधित पदांसाठी आहे. सी.एम.ओ साठी 55 हजार रुपये दरमहा मानधन दिले जाणार आहे. तर, शिफ्ट ड्युटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना 50 हजार तर, पाच वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना 45 हजार इतके मानधन दिले जाणार आहे.

या पदांसाठी 23 तारखेला रूग्णालयामध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यशवंतराव चव्हाण रूग्णालय पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले की, “”रूग्णालयात वाढत्या रूग्ण संख्येनुसार सध्या उपलब्ध असलेल्या डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्याबाबत महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. रूग्णालयात शल्यचिकित्सा विभागासाठी जेमतेम पदे भरली आहेत. “क्ष’ किरणशास्त्र विभागासाठी तज्ज्ञ प्राध्यापक अद्याप मिळालेले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.