पुणे | गणेशोत्सवात चोरटे सक्रीय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्याला गुन्हे शाखेने पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून १६ मोबाइल संच जप्त करण्यात आले.
उमर सलीम शेख (वय १९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवानिमित्त गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक गस्त घालत होते.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात शेख थांबला असून, त्याने गर्दीत नागरिकांकडील मोबाइल चोरल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, शुभम देसाई यांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शेखला पकडले. पोलिसांनी शेख चैाकशी केली. तसेच दुचाकीच्या डिक्कीची पाहणी केली. तेव्हा १६ मोबाइल सापडले. त्याला समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सहायक पाेलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखील जाधव, साधना ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.





