“त्यांच्याकडे आता फक्त सहा महिने राहिले, भाजप हटाव इंडिया बचाव” ; ममता बॅनर्जींकडून भाजपला डेडलाईन

नवी दिल्ली :आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसयांच्या मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती लगावली. यावेळी बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोदी सरकारकडे आता फक्त सहा महिने राहिलेत, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला डेडलाईन दिली आहे.
भाजपने २०२४ च्या निवडणुकीत लोकसभेच्या ४२ जागांपैकी ३५ जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यावर बोलताना ममता म्हणाल्या की, “भाजपने प्रयत्न करावा. पण, त्यांच्याकडे आता केवळ सहा महिने शिल्लक राहिले आहेत. मोदी यांना हटवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करु. मी इंडिया आघाडीच्या सोबत आहे.असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी,”मुस्लिम धार्मिक नेत्यांच्या कार्याक्रमात बोलताना ममता यांनी मुस्लिमांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. राज्यातील इमामांना मिळणाऱ्या भत्त्यामध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील पुजाऱ्यांसाठीही अशीच वाढ करण्यात आली आहे. मी जेव्हा रोझाच्या महिन्यात उपवास सोडला तेव्हा यांनी माझ्यावर टीका केली. माझं नावही बदलण्यात आलं,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
त्यासोबतच “मी जेव्हा आदीवासींसोबत नृत्य केलं तेव्हा त्यांनी काही म्हटलं नाही. ते फक्त मुस्लिमांसंबंधी रागावलेले आहेत. मी जेव्हा पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक लोकांबद्दल बोलते तेव्हाच त्यांना मुंगी चावल्याचा त्रास होतो. मी धर्माच्या नावावर त्यांना विष पेरु देणार नाही”, अशी टीका ममतांनी यावेळी केली.





