हे लोक भारताचं नाव बदलून ‘अमेरिका’ करतील; विजेंदर सिंगचा मोदी सरकारला टोला
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेली टीका अजून थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज माजी ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदरसिंग यानेही या वादात उडी घेऊन पुरस्काराचे नाव बदलण्याच्या कृतीवर चांगलाच टोला लगावला आहे.
त्याने कोणत्याही पुरस्काराचा किंवा पुरस्काराच्या नामांतराचा थेट उल्लेख न करता म्हटले आहे की, उद्या हे लोक भारताचे नामांतरही अमेरिका करू शकतील.
बॉक्सर असलेल्या विजेंदरसिंग याने 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉंझ पदक पटकावले आहे. त्यामुळे त्याच्या टिकेला महत्त्व दिले जात आहे. मात्र तो एकदा कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढला होता, त्यामुळे त्याने त्या मानसिकतेतून ही राजकीय टीका केली असावी, असेही मानले जात आहे.





