#T20WorldCup : टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात लवकर बाहेर पडत ‘या’ बलाढ्य संघानी केलंय आश्चर्यचकित; भारताचाही आहे समावेश….

Big teams surprised by early exit in T20 World Cup history : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत आतापर्यंत खूपच अनेक उलटफेर पाहयला मिळाले. खरे तर, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघा व्यतिरिक्त, श्रीलंका आणि न्यूझीलंड लीग टप्प्यातच बाहेर पडले होते. हे संघ सुपर-8 फेरीत खेळतील हे निश्चित मानले जात होते, परंतु छोट्या संघांविरुद्ध पराभूत झाल्याने त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या.
मात्र, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ नाही. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर मोठे-बलाढ्य संघ लवकर बाहेर पडत आले आहेत. तथापि, आज आपण टी-20 विश्वचषक इतिहासातील त्या क्षणांवर एक नजर टाकू जेव्हा मोठ्या संघांना सुरुवातीलाच म्हणजे लीग टप्प्यातूनच बाहेर पडावे लागले आहे.
टी20 विश्वचषकातील मोठ्या संघांच्या लवकर बाहेर पडण्याचा इतिहास…
टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत पाकिस्तान व्यतिरिक्त, श्रीलंका आणि न्यूझीलंड लीग टप्प्यातच बाहेर पडले होते. तर 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकले नव्हते. त्यामुळे या दोन बड्या संघांचा प्रवास पहिल्या फेरीतच थांबला होता. त्याच वेळी, या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर 2014 मध्ये दिसला. खरे तर 2014 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते.
टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत ‘या’ संघांची झाली फसगत..
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर नेपाळ विरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला होता. जर आपण न्यूझीलंडबद्दल बोललो तर अफगाणिस्तानने त्यांचा 84 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर वेस्ट इंडिजनं 13 धावांनी पराभव झाला. मात्र, किवी संघाला युगांडाविरुद्ध विजय मिळवता आला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर पाकिस्तानी संघाची खूपच फसगत झाली. अमेरिकेनंतर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आतापर्यंत या स्पर्धेतील पाकिस्तानचा एकमेव विजय कॅनडाविरुद्ध झाला आहे.





