‘ही’आहेत सर्वाधिक फॉलोअर्स असणारी इन्स्टा अकाउंट

सध्याच्या सतत उत्क्रांत होत असलेल्या डिजिटल जगाने आपली परस्परांशी संभाषणाची आणि जोडले जाण्याची पद्धतच बदलून टाकलेली आहे. अशा या ऑनलाइन जगामध्ये परस्परांशी संवादासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरी त्यामध्ये इंस्टाग्राम हा सर्वाधिक प्रभावी आणि सर्वाधिक वापरकर्ते असणारा ठरलेला आहे. अगदी खेळाडूंपासून ते हॉलीवुड मधील अभिनेते बॉलिवूड मधील अभिनेते दक्षिणात्य अभिनेते या सगळ्यांची इंस्टाग्राम अकाउंट आहेत आणि त्यांचे लक्षावधी फॉलोअर्स देखील आहेत. अशाच काही इंस्टाग्राम अकाउंट विषयी…
१) क्रिस्तियानो रोनाल्डो
पोर्तुगालच्या या फुटबॉलपटूची लोकप्रियता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट च्या फॉलोवर्स वरूनही अधोरेखित होते. जगभर क्रिस्तियानो रोनाल्डोचा अतिशय प्रभाव आहे. तो लोकप्रिय आहे. खेळाडू असल्याबरोबरच अतिशय संवेदनशील व्यक्ती म्हणूनही त्याची ओळख आहे. तो आजही आई सोबतच राहतो आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या शीतपेयांचे प्रमोशन जाणीवपूर्वक करत नाही. यामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढलेली आहे. सध्या इंस्टाग्रामवर त्याचे 63 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत.
२) लिओनेल मेस्सी
फुटबॉल विश्वातील हा आणखी एक लोकप्रिय खेळाडू. तो देखील अतिशय प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. त्याच्या अकाउंटवर मैदानातील त्याचे कौशल्य, दाखवणारे अनेक व्हिडिओ आहेत तसेच त्याच्या कौटुंबिक आयुष्य विषयीच्या घटना दाखवणारे देखील व्हिडिओ आहेत. त्याचे इंस्टाग्रामवर 50 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत.
३) सेलेना गोमेज
अमेरिकेतील गायिका आणि अभिनेत्री असणाऱ्या सेलेना गोमेजचे इंस्टाग्राम वर 42 कोटी ६० लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या अकाउंटवर प्रामुख्याने तिच्या म्युझिक रिलीज चे व्हिडिओ असतात. तसेच तिच्या अभिनय कारकीर्दीचे आणि तिची दैनंदिनी तसेच रिलेशनशिप याविषयीची माहिती देणारे व्हिडिओज असतात.
४) कायली जेन्नर
ही अमेरिकेतील रियालिटी टीव्ही स्टार तसेच व्यावसायिक आहे. तिच्या अकाउंटवर सौंदर्य, जीवनशैली, व्यावसायिक घडामोडी याविषयीची माहिती असते. कायली तिच्या सौंदर्यप्रसाधनांच्या साम्राज्य बद्दल आणि जीवनशैली बद्दल ओळखली जाते. तिच्या अकाउंट वर विविध प्रकारची फॅशन कौटुंबिक घडामोडी व्यवसायिक हालचाली याविषयीची माहिती असते. तिचे इन्स्टावर ३९ लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत.
५) ड्वेन जॉन्सन
अभिनेता, निर्माता आणि एकेकाळचा कुस्तीगीर अशी ओळख असलेल्या जॉन्सनने हळूहळू इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवलेली आहे. इंस्टाग्राम वर त्याचे 39 कोटी 60 लाख फॉलोवर्स आहेत. त्याचे चित्रपट विषयक प्रोजेक्टच्या पडद्यामागील घडामोडी, प्रेरक संदेश, वर्कआउट रुटीन याविषयीची माहिती त्याच्या अकाउंटवर असते. त्याखेरीज सकारात्मकता आणि प्रेरणादायी व्हिडिओज देखील तो अपलोड करत असतो.
६) अरियाना ग्रँड
अतिशय सुरेख शब्दफेक आणि स्टेजवर असताना प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याची क्षमता यामुळे अरियाना लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट म्हणजे जगभरातील संगीतप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरलेले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह परफॉर्मन्स, म्युझिक व्हिडिओ, वैयक्तिक घडामोडी आणि तिचा कलाविषयक प्रवास याविषयीची माहिती असते. इंस्टाग्रामवर तिचे 37 कोटी ८ लाख फॉलोअर्स आहेत.
७) किम कार्दशियान
रियालिटी टीव्ही स्टार आणि महिला उद्योजक म्हणून किम कार्डाशी यांची ओळख आहे तिच्या इन्स्टा अकाउंटवर तिची फॅशन विषयक निवड, सौंदर्य विषयक माहिती आणि कुटुंबातील घडामोडींची माहिती देणारे व्हिडिओज असतात. त्याखेरीज फॉलोअर्सला रिलेट करणारे दैनंदिन जीवनातील अनेक व्हिडिओ ती अपलोड करत असते. तिचे 36 कोटी 10 लाख फॉलोवर्स आहेत.
८) बीऑन्स
तिच्या अकाउंटवर संगीत, कला आणि महिला सक्षमीकरणा संबंधातील व्हिडिओ असतात. तिचे जगभर कोट्यावधी चाहते आहेत. अनेकदा तिच्या अकाउंटवर लाईव्ह परफॉर्मन्स, अल्बम प्रकाशन आणि तिच्या अन्य प्रोजेक्टची माहिती देणारे व्हिडिओ असतात. तिचे इन्स्टावर 31 कोटी 70 लाख फॉलोअर्स आहेत.
९) कोल कार्दशियान
तिच्या अकाउंटवर फिटनेस विषयक माहिती देणारे व्हिडिओ, जीवनशैली विषयक तिच्या आवडीनिवडी आणि व्यावसायिक घडामोडींची माहिती देणारे व्हिडिओज असतात. सर्वसामान्य चाहते रिलेट करू शकतील असा कंटेंट तिच्या अकाउंटवर पाहायला मिळतो. तिच्या इन्स्टावर 30 कोटी 80 लाख फॉलोअर्स आहेत.
१०) जेन्नर केन्डेल
मॉडेल आणि रियालिटी टीव्ही स्टार असलेली केन्डेल ही सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या दहा सेलिब्रिटींच्या यादीत शेवटच्या स्थानावर आहे. तिच्या अकाउंटवर तिचे करिअर फॅशन आणि सौंदर्य विषयक माहिती देणारे व्हिडिओज असतात. तिची वैशिष्ट्यपूर्ण स्टाईल आणि तिच्या शूटिंग मधील क्षणचित्रे तसेच रोजच्या जीवनातील घडामोडी याविषयीच्या व्हिडिओ असतात. तिचे इन्स्टावर 29 कोटी 20 लाख फॉलोअर्स आहेत.





