Play Store : गुगल प्ले स्टोअरवरून अनेक अॅप काढून टाकण्यात आले आहेत या अॅप्समध्ये 9 क्रिप्टो अॅप्सचा समावेश आहे. जर तुम्ही तुमच्या फोनवर क्रिप्टो अॅप्स वापरत असल्यास तुम्ही देखील हे अॅप्स तुमच्या फोनमधून काढून टाका. कारण हे अॅप्स अधिकृतपणे Google Play Store India वरून काढून टाकण्यात आले आहेत. Google ने ज्या अॅप्सवर कारवाई केली आहे त्यात Binance आणि Kraken सारख्या अॅप्सचा समावेश आहे.
मागील महिन्यात डिसेंबर 2023 मध्ये भारतीय वित्त मंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलेक्चुअल युनिट (FIU) ने क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अॅप विरोधात नोटीस जारी केली होती. त्यानंतर या अॅप्सवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात, FIU ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला हे 9 अॅप आणि त्यांच्याशी संबंधित URL ब्लॉक करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता Binance, कुकोइन, हुओबी, Gate.io, क्रॅकेन, MEXC ग्लोबल, बिटफेनेक्स, बिट्रेक्स, बिटस्टॅम्प या 9 अॅप्सचा तुम्हाला वापर करता येणार नाही.
‘या’ कारणामुळे अॅप्सवर घातली बंदी
मनी लाँडरिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या अॅप्सचा भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारताने क्रिप्टोकरन्सीच्या वापरास मान्यता दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने ५ वर्षांपूर्वी क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर बंदी घातली होती. क्रिप्टो चलनाच्या वापराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते, तरीही या प्रकरणात कोणताही दिलासा मिळू शकला नाही.