Pune Tourism: पुण्याजवळची ‘ही’ ५ सुंदर पर्यटनस्थळे; एका दिवसात फिरून परत येण्यासाठी आहेत बेस्ट पर्याय!
Pune Tourism पुण्याच्या आसपास अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत आरामात परत येता येते. निसर्ग, इतिहास आणि शांत वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या.

Pune Tourism: आठवडाभराच्या धकाधकीनंतर विकेंडला मनःशांती मिळवण्यासाठी अनेक जण एक दिवसाच्या सहलीचा पर्याय निवडतात. पुण्याच्या आसपास अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत आरामात परत येता येते. निसर्ग, इतिहास आणि शांत वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या.
१. सिंहगड किल्ला (Pune Tourism)
पुण्यापासून अगदी जवळ असलेला सिंहगड किल्ला इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र आहे. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य, थंडगार वारा आणि झुणका-भाकर, पिठलं-भाकरी यांचा आस्वाद पर्यटकांच्या सहलीला खास बनवतो. सकाळच्या ट्रेकसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
अंतर : पुण्यापासून सुमारे ३५ किमी.

Pune Sinhagad Fort
२. मुळशी धरण ( Pune Tourism)
निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायचा असेल, तर मुळशी धरण हा उत्तम पर्याय आहे. हिरव्यागार डोंगररांगा, विस्तीर्ण जलाशय आणि पावसाळ्यात धुक्याने वेढलेले रम्य वातावरण पर्यटकांना भुरळ घालते. कुटुंबासोबत पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी हे आदर्श ठिकाण आहे.
अंतर : पुण्यापासून सुमारे ४५ किमी.

Mulshi Dam
३. लोणावळा
पुणेकरांसाठी विकेंडला सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणजे लोणावळा. टायगर पॉईंट, भुशी धरण, राजमाची पॉईंट आणि प्रसिद्ध चिक्की यामुळे हे ठिकाण नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असते. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसते.
अंतर : पुण्यापासून सुमारे ६५ किमी.

Lonavala
४. पानशेत धरण
पानशेत धरण हे पुण्याजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. येथे पिकनिक, फोटोग्राफी तसेच बोटिंगचाही आनंद घेता येतो.
अंतर : पुण्यापासून सुमारे ४० किमी.

पानशेत धरण
५. ताम्हिणी घाट
धबधबे, दाट जंगल आणि वळणावळणाचे घाटरस्ते यामुळे ताम्हिणी घाट निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच मानला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. शांत वातावरणात एक दिवस घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.
अंतर : पुण्यापासून सुमारे ५० किमी.

ताम्हिनी घाट
टीप : विकेंडला या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात करणे, हवामानाचा अंदाज तपासणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे अधिक सोयीचे ठरेल.





