आता रेमडेसिविरचा तुटवडा भासणार नाही; भारताने दिली 4.5 लाख रेमडेसिविर वायल्सची ऑर्डर
Updated On:

नवी दिल्ली, दि. 30 – वायल्सची ऑर्डर भारत सरकारने साडेचार लाख रेमडेसिविर वायल्सची ऑर्डर विदेशात नोंदवली आहे, अशी माहिती केंद्रीय खते आणि रसायन मंत्रालयाच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. देशात या औषधाची टंचाई असल्याने विदेशातून हे औषध आयात केले जात आहे.
यातील पहिले 75 हजार वायल्स आज शुक्रवारी भारतात दाखल झाले. करोना रुग्णांसाठी हे औषध मोठ्या प्रमाणात सध्या वापरले जात आहे. भारत सरकारच्या मालकीच्या एचएलएल लाईफ केअर कंपनीमार्फत अमेरिका आणि ईजिप्तमधील औषध कंपन्यांकडून हे औषध मागवले जात आहे.
येत्या एक दोन दिवसांत रेमडेसिविरच्या आणखी 75 हजार ते 1 लाख वायल्स भारतात पोहोचणार आहेत. येत्या 15 मेपूर्वी आणखी एक लाख वायल्स भारतात पोहोचतील. त्यामुळे भारतीय बाजारातील ही औषध टंचाई बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकणार आहे.





