Satara | आम्हां भावांमध्ये स्पर्धा असेल माण-खटावच्या विकासाची – शेखर गोरे

वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी) – तुम्ही सर्व राजकीय स्वार्थासाठी एक होता. मग सख्खे भाऊ एक का होवू शकत नाहीत. आजपर्यंत आम्हाला वेगवेगळे ठेवण्याचं काम राजकीय पक्षांनी केलं! विरोधकांना आम्हा दोघांना राजकारणातून संपवायच होत. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले संपवायच परंतु तेच राजकारणातून संपले.
जयकुमार गोरे यांनी पंधरा वर्षात माण खटावच्या जनतेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम केले. म्हणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. येत्या काही काळात माण खटाव सुजलाम सुफलाम दिसलेला आपणाला पहायला मिळेल. आम्हा भावांमध्ये स्पर्धा असेल तर माण -खटावच्या विकासाची असे प्रतिपादन शेखर गोरे यांनी केेले.
बनगरवाडी, ता. माण येथील विठ्ठल मंदिरात मतदारांशी संवाद साधलताना शेखर गोरे बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. शेखर गोरे यांनी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले संपवायचे परंतु, तेच राजकारणातून संपले. जयकुमार गोरे यांनी पंधरा वर्षात माण खटावच्या जनतेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम केले. काही गावांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते तिथे ह्या शेखर गोरे यांनी पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
बोराटवाडीत येऊन मारीन म्हणतोय पण आधी गाठ शेखर गोरे याच्याशी असल्याचा इशारा देत शेखर गोरे म्हणाले, कोण म्हणतो मला पवार साहेबांनी शब्द दिलाय की विधानपरिषद सदस्य करतो. कोण म्हणतो मला मंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. कोणी काहीही म्हणू द्या, हा शेखर गोरे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणतेही पद नसताना स्वखर्चाने माण खटाव तालुक्यात शेकडो कामे केली. मग दोघे भाऊ आमदार झाल्यावर किती कामे होतील. जनतेने ठामपणे आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्यावे. यावेळी बर्याच जणांचे पक्षप्रवेश झाले. यावेळी बनगरवाडीतील महिला, ग्रामस्थ तसेच शेखर गोरे यांना मानणारे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.




