चर्चा तर होणारच.! पॉर्नस्टारने केलं रिंकू सिंगचं तोंड भरून कौतुक; ‘ते’ ट्विट होतोय व्हायरल

नवी दिल्ली – कोलकाता नाईट रायडर विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात रिंकू सिंगने अखेरच्या 5 बॉल्स मध्ये 28 रन्सची गरज असताना सलग 5 सिक्स ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.
रिंकूनं 21 बॉल्स मध्ये 48 रान्सची नाबाद खेळी साकारली आहे. केकेआर च्या हातातून निसटता विजय त्याने अक्षरशः खेचून आणला आहे. सध्या त्याच्या या स्फोटक खेळीची चर्चा सर्वत्र होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट चाहत्यांनी देखील 25 वर्षांच्या रिंकूच्या खेळीचं कौतुक केलं आहे. अशातच अमेरिकन पॉर्नस्टार ‘केंद्रा लस्टनं’ने सुद्धा रिंकूचं तोंडभरून कौतुक केलं आहे. केंद्रानं तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रिंकू सिंग सोबतचा एडिट फोटो शेअर केला आहे.
आणि कॅप्शन मध्ये ‘रिंकू द किंग..’ असं म्हणत त्याच कौतुक केल आहे. केंद्राचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.






