चर्चा तर होणारच.! जान्हवी कपूर पुन्हा दिसली एक्स बॉयफ्रेंडसोबत; फॅन्स म्हणाले, “काही तरी गडबड…’

मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. अश्यातच अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये जान्हवी एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसून आली आहे.
जान्हवी काही वर्षापूर्वी शिखर सोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र त्यांचं ब्रेकअप झालं. आता शिखर जान्हवीसाठी एक्स बॉयफ्रेंड आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती शिखरसोबत फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशी गेली होती. यावेळी तिथले काही फोटोही जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले.
शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला असून, यामध्ये जान्हवीचा हॉट अंदाज स्पष्टपणे पाहायला मिळाला. यावेळी जान्हवीने तीन फोटो शेअर केले होते. दरम्यान, जान्हवीने जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्याचवेळी शिखर पहाडियानेही समुद्र किनाऱ्याचा फोटो शेअर केला होता.
जान्हवीने आणि शिखर दोघांनीही शेअर केलेल्या फोटोत चंद्र-चांदणं तर आहेच शिवाय दोन्ही फोटोत सारखंच आकाश पाहायला मिळालं. जान्हवी-शिखर यांच्या फोटोतील हे साम्य पाहता युजर्सचा असा अंदाज आहे की हे दोघेही एकत्र असावेत. काही तरी गडबड आहे असं म्हणत चाहत्यांनी कमेंट करायला सुरूवात केली आहे.
मात्र, आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात जान्हवी एक्स बॉयफ्रेंड शिखरसोबत आली. यावेळी जान्हवीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला असून, ती नेहमीप्रमाणेच ग्लॅमर्स दिसत होती.






