Indian Army Press Conference | भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुख दलाच्या पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत आणि पाकिस्तानमधील सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराने पाक लष्कराशी आमचा लढा नसल्याचे स्पष्ट केले. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना लक्ष केले होते. पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले की, “आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं योग्य मानले. म्हणून, पाकिस्ताननं ही लढाई स्वतःची लढाई बनवली म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं. आम्ही दहशतवादाविरुद्ध कारवाई केली. मात्र भारताच्या संरक्षण यंत्रणेत प्रवेश करणे अशक्य आहे. पाकिस्ताननं डागलेले चिनी क्षेपणास्त्रही अयशस्वी झाले.” तसेच पाकने तुर्की बनावटीचे ड्रॉन वापरल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी हल्ल्यांना अयशस्वी ठरवण्यासाठी भारतीय लष्कराने नेमके काय नियोजन केले होते, याबाबतही यावेळी सांगण्यात आलं आहे. राजीव घई यांनी सांगितले आहे. “जेव्हा जेव्हा पाकिस्तानने 9 आणि 10 मे रोजी आपल्या हवाई क्षेत्रात तसेच लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन्समध्ये हल्ले केले ते आपल्या मजबूत एअर डिफेन्स ग्रिडसमोर अपयशी ठरले. या ग्रिडमध्ये एकूण चार स्तर होते. रडार, काऊंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम्स, शोल्डर फायर वेपन्स, व्हिटेंज एअर डिफेन्स वेपन्स त्यानंतर शेवटी लष्कराचे अत्याधुनिक एअर डिफेन्स वेपन सिस्टिमस तत्पर होते. त्यामुळेच आमची मल्टि टियर डिफेन्स पार करून पाकिस्तान भारताचे हवाई क्षेत्र तसेच लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन्स टार्गेट करू शकण्याची शक्यता धुसर होती, असं राजीव घई यांनी सांगितलं. “पहलगाम हल्ल्यानंतर जे झालं त्याबाबत आम्ही तुम्हाला अगोदरच माहिती दिली आहे. दहशतवाद्यांवर आपण केलेले हल्ले हे आंतररराष्ट्रीय सीमेत न जाता केले होते. पाकिस्तानदेखील सीमेच्या पलिकडून हल्ले करू शकतो, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळेच हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी आम्ही पहिल्यापासूनच तयार होतो. काऊंटर मॅन्ड एरिएल सिस्ट्मस, इलेक्ट्रॉनिक वारफेअरची साधनं, एअर डिफेन्स वेपन्स यांचा आम्ही विशेष ताळमेळ घातला होता. त्यामुळेच पाकिस्तानी वायूदलाने जेव्हा जेव्हा रात्री हल्ले केले ते विफल ठरले. असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, भारत-पाकच्या डिजीएमओच्या चर्चेची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही डिजीएमओ संध्याकाळी चर्चा करतील, अशी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या चर्चेवर देखील सर्वांची नजर असणार आहे. कोणते महत्वाचे मुद्दे आणि निर्णय यामध्ये घेतले जातील हे पाहणे महत्वाचे आहे.