Satara News : नागठाणे गटात कुणालाही छुपा पाठिंबा नाही; भाजपचे अजित साळुंखे, राजेंद्र ढाणे, सुषमा जाधव यांनाच निवडूण द्या
Satara News : यावेळी बोलताना सर्वजण भाजप उमेदवारांचे कमळ चिन्हाचे काम करणार आहेत. त्यामुळे मनातील किंतू पंरतू काढून टाका, असे आवाहनही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

नागठाणे : नागठाणे जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अतित येथे पदयात्रा व सभा झाली. त्यामध्ये एकट्या नागठाणे गटात शासनाच्या वतीने गणेशवाडी, समर्थगाव काशीळ, भाटमरळी मांडवे अशा उपसासिंचन योजनांच्या खर्चा पोटी व निव्वळ पाण्यावर १०५ कोटींचा निधी आम्ही दिला आहे. त्यासोबतच काशीळ कोपर्डे पुलासाठी ४४ कोटी मंजुर केलेत याचा पुनुरुच्चार मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी केला.
केंद्र राज्यात भाजपची सत्ता आहे. आता जिल्हा परिषदेमध्येही येणार आहे. त्यासाठी मतदारांनी भाजपच्याच पाठीमागे उभे रहावे आम्ही विकासकामात कमी पडणार नाही असे वचन मंत्री महोदय व आमदारांनी दिले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आप्पा, यशवंत साळुंखे , मनोहर साळुंखे, युवराज जाधव , तानाजी जाधव, रविंद्र कदम आप्पा, समृद्धी जाधव, मोहनराव जाधव, राहुल गायकवाङ अशी नेत्यांची मोठी फळी उपस्थित होती. यावेळी बोलताना सर्वजण भाजप उमेदवारांचे कमळ चिन्हाचे काम करणार आहेत. त्यामुळे मनातील किंतू पंरतू काढून टाका, असे आवाहनही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
राहुल गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून घेणार
वर्णे जिल्हापरिषद गटातील इच्छुक उमेदवार राहुल गायकवाड यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. पक्षाच्या उमेदवारासाठी चांगला निर्णय घेतला. त्यामुळे मी व आमदार मनोजदादा आम्ही राहुल गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून घेणार आहोत हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
हेही वाचा : Budget 2026: अर्थसंकल्पातून मुलींसाठी मोठी भेट ; प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतिगृहाची निर्मिती होणार





