Rajnath Singh : “हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये स्पर्धा नाही” – राजनाथ सिंह

Rajnath Singh – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी भाषेच्या मुद्द्यावर द्रमुकच्या भूमिकेवर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टी हिंदी आणि इतर सर्व भारतीय भाषांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये स्पर्धा नाही तर सहकार्याची भावना आहे असे राजनाथ यांनी म्हटले आहे.
भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. तमिळ राणी वेलु नाचियार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजप महिला मोर्चाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ म्हणाले की, काही लोक तमिळ आणि हिंदीवरून वाद निर्माण करत आहेत.
उत्तर भारतात वेलू नाचियारबद्दल जागरूकता पसरवण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, हिंदी आणि इतर भारतीय भाषा एकमेकांना बळकट करतात.
काही लोक त्या मुघल शासक औरंगजेबाला आपला आदर्श मानतात, ज्याने इतर धर्मांच्या अनुयायांवर अत्याचार केले यावर राजनाथ यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे युग सुरू केले आहे. आता त्यांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी कमिशन मिळत आहे याकडेही राजनाथ यांनी लक्ष वेधले.





