‘एका वडिलांसाठी यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही’; अभिषेकसाठी अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट
Amitabh Bachchan Post | बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. यातच आता अभिषेक बच्चनला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IIFM) २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील साकारलेल्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला.
अभिषेकच्या या कामिगरीचे अमिताभ बच्चन यांनी देखील कौतुक केले आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनचे काही फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
‘एका वडिलांसाठी यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही’
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत लिहिले, “अभिषेक, तू कुटुंबाचा अभिमान आणि सन्मान आहेस. आजोबांनी जो वारसा दिला, तो वारसा तो यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेस. सातत्य, कधीही हार न मानणे, कितीही हरलो तरी प्रयत्नांनी पुन्हा उठेन, असा तुझा स्वभाव आहे. वेळ लागला, पण तू कधीही हार मानली नाही, तू जगाला तुझी ताकद दाखवली. मेलबर्नमध्ये त्यांनी तुला सर्वोत्तम अभिनेता म्हणून घोषित केले. एका वडिलांसाठी यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही.”
T 5472(i) – You are not just the COVER of the magazine .. you have covered us all with pride and love .. a blessing for us you cannot even begin to imagine 🕺❤️👏 pic.twitter.com/wQJxTpunEL
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 15, 2025
पुढे त्यांनी लिहिले, “वर्षभरापूर्वी मी तुझ्या एक सुंदर परफॉर्म्सचे कौतुक केले होते. त्यावेळी सर्वांनी माझी थट्टा केली होती. मी तुझा पिता आहे म्हणून मी तुझे कौतुक करत आहे, असे सर्वांचे म्हणणे होते. पण, आता त्या थट्टेची जागा आदर आणि कौतुकासाठीच्या टाळ्यांनी घेतली आहे. जिंकणं हे उत्तर आहे. जिंकण्याची किंमत जास्त आहे. अभिषेक तू सिद्ध केलं आहे. शांत राहा आणि तुझ्या मर्जीनुसार जग. तुझ्या कुटुंबाला तुझा अभिमान आहे. खूप प्रेम…” Amitabh Bachchan Post |
सोबतच अमिताभ यांनी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमधील आणि मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील अभिषेकचे फोटो शेअर केले आहे. Amitabh Bachchan Post |
हेही वाचा :
सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; हजारो तरुणांना मिळणार रोजगार?





