..मग ब्रिजभुषणवर काय कारवाई केल ? महिला अत्याचारावर बोलणाऱ्या पंतप्रधानांना कॉंग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी राजस्थानात महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढले असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ (Gaurav wallabh) यांनी भाजप खासदार ब्रिजभुषण शरणसिंह (brijbhushan Sharansingh) यांचे प्रकरण उपस्थित केले. ते म्हणाले महिलांवरील अत्याचाराची काळजी असलेल्या पंतप्रधानांनी ब्रिजभुषण शरणसिंह यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल उपस्थित केला आहे.
ब्रिजभुषण यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार करीत दिल्लीत धरणे आंदोलन केले होते. राजस्थानात कोणताही गुन्हा त्वरीत नोंदवून घेण्याची सक्त सुचना असल्याने पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारींची संख्या वाढली असल्याचे दिसते आहे. अन्य राज्यांत अशी परिस्थिती नाही, तेथे गंभीर गुन्हांच्याही तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत असे गौरव वल्लभ म्हणाले. (brijbhushan singh vs womens wressler)
वल्लभ पुढे म्हणाले की, “राजस्थानमध्ये, मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कोणीही तक्रार नोंदवायला आल्यास त्वरीत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत आणि म्हणूनच आमच्याकडे गुन्ह्यांचा आकडा वाढलेला दिसतो आहे. पण इतर राज्यांमध्ये, मोठ्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा क्वचितच एफआयआर नोंदवले जातात. आम्ही बलात्कार करणाऱ्यांना कधीही समर्थन देत नाही. (Congress vs bjp)
भाजप नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे, आपण ब्रिजभूषण सिंह यांना विसरू शकतो का? असा सवाल त्यांनी केला त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांना कॉंग्रेसने उदयपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.





