Voter List : निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी सखोल पुनरिक्षण (एयआयआर) कार्यक्रमानुसार, सध्याच्या मतदार यादीतील नावांचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत आढळणार नाही किंवा जे आपली नागरिकता सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करू शकणार नाहीत, अशांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात भोसरी, चिंचवड, पिंपरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात आहे. शहराच्या सध्याच्या मतदार यादीनुसार एकूण मतदार १७ लाख १३ हजार ८९१ आहेत. सुमारे १५०० बीएलओमार्फत ऑनलाइन मॅपिंग सुरू आहे. आतापर्यंत ३० टक्के मतदारांचे मॅपिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. निवडणूक यादीतील दुबार नावे वगळणे, बोगस मतदानावर लगाम लावणे आणि केवळ पात्र भारतीय नागरिकांचाच समावेश यादीत असावा, या उद्देशाने हा मॅपिंग कार्यक्रम राबवला जात आहे. मतदाराचे नाव चुकीचे असणे, फोटो चुकलेला असणे तसेच दुबार नाव असलेल्या मतदारांची नावे यादीमधून हटविण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या जुन्या यादीत सापडत नाही, त्यांना त्यांची नागरिकता आणि रहिवास सिद्ध करण्यासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर १३ प्रकारचे अधिकृत पुरावे सादर करावे लागणार आहेत. केवळ नाव असून चालणार नाही, तर वयोगटानुसार पुराव्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. १९८७ पूर्वी जन्मलेल्या मतदारांना त्यांचे जन्म ठिकाण आणि जन्म तारखेचा ठोस पुरावा द्यावा लागेल. सन १९८७ ते २००४ दरम्यान जन्मलेल्या मतदारांना जन्म दाखला आणि रहिवासी पुरावा बंधनकारक असणार आहेत. तर २००४ नंतर जन्मलेल्या मतदारांना स्वतःच्या जन्माच्या पुराव्यासोबतच आई-वडिलांच्या जन्माचा आणि नागरिकत्वाचा पुरावा देणे बंधनकारक आहे. मतदारांना १३ पुराव्यांद्वारे नागरिकत्व सिद्ध करावे लागेल. ज्यांनी पुरावे जोडले नाही किंवा प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले, असे मतदार यादीतून कायमचे डिलीट होणार आहेत. शहरातील एकूण मतदारसंख्या : १७, १३, ८९१ पुरुष : ९,०४,८१५ महिला : ८,०७, १३९ इतर : १९ अग्रलेख : अनिश्चितता