Chhagan Bhujbal | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीने मोठे यश मिळवले. यात आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माघार घेतली. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री भाजपचा असणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून ईव्हीएम मशिनबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यावरून आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून विजयी झाले. दरम्यान कायमच मोठ्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या भुजबळांचे मताधिक्य यंदा घटले. यावर त्यांनी भाष्य केले आहे. Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचा महाविकास आघाडीला टोला “मागच्या निवडणुकीत मला 56, 57 हजाराचे लीड होते. माझे मतदान 1 लाखावर जायला हवे होते. पण जरांगेंमुळे एका मोठ्या वर्गाचे मतदान मिळाले नाही. ईव्हीएममध्ये गडबड असती तर माझे मताधिक्य वाढले असते ते कमी का झाले? लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते, काहीतरी कारणे शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडावे लागते,” असे म्हणत छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. Chhagan Bhujbal | नव्या सरकारच्या शपथविधीवरही छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “पुढील दोन-चार दिवसांत शपथविधीचे कार्यक्रम पार पडतील. आज दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरविला जाणार आहे. 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणे हे स्वाभाविक आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही.” “शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस होतील असे म्हटले जात होते. पण, शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी फडणवीस यांनी मी बाहेर राहतो असे म्हटले होते. पण पक्षाचा आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. एक प्रकारे ती सुद्धा अवहेलना असते. पण त्यांनी ती सहन केली आणि 100 टक्के कामाला झोकून दिले, रात्रंदिवस काम करत महायुतीला जिंकून दिले,” छगन भुजबळ यांनी म्हटले.Chhagan Bhujbal| नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांना १,३१,९४५ इतकी मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार मानिकराव शिंदे यांना १,०५,८८७ इतकी मते मिळाली. यामध्ये छगन भुजबळ यांनी २६,०५८ मताधिक्याने विजय मिळवला. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा ५६,५२५ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा भुजबळांचे मताधिक्य घटल्याचे दिसत आहे. Chhagan Bhujbal | हेही वाचा: मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांना कॉल, महिलेला घेतलं ताब्यात