Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री 9च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची फोन करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याच कळतय. या महिलेच वय 34 वर्ष असल्याच समजतय. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, अनेकांसाठी हा धक्कादायक निकाल असल्याचं बोललं जात आहे. सध्या महायुती 225 जागांवर तर महाविकास आघाडी 55 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागांवर आघाडीवर आहेत. चित्र पुरेसं स्पष्ट आहे. 15 व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे.
याआधीही मिळाली होती जीवे मारण्याची धमकी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.