Alia Bhat | बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या नव्या बंगल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याबद्दल आलियानं इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या गोपनीयतेचं उल्लंघन केल्याचे तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे. आलिया सोशल मीडिया पोस्ट – आलिया भट्टने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “माझं म्हणणं तुम्हाला समजलं असेल की, मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित आहे. कधीकधी तुमच्या खिडकीतून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं घर दिसतं. पण याचा अर्थ असा नाही की, कोणालाही तुमच्या खाजगी घराचा व्हिडीओ बनवण्याचा आणि ते ऑनलाईन प्रसिद्ध करण्याचा अधिकार आहे. आमच्या घराचा जे अजूनही बांधकाम सुरू आहे, त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो आमच्या परवानगीशिवाय अनेक माध्यमांनी प्रसारित केला आहे.” “आमच्या प्रायव्हसीचा भंग करणारी ही कृती आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या आहे. परवानगीशिवाय कोणाच्याही खाजगी जागेचे व्हिडिओ किंवा फोटो काढणे हा content नाही, तर तो एक गुन्हा आहे. ही कृती सामान्य मानली जाऊ शकत नाही. कृपया विचार करा, तुमच्या घराच्या आतील भागाचे व्हिडिओ तुमच्या परवानगीशिवाय सार्वजनिकपणे शेअर केलेले तुम्हाला आवडतील का? आपल्यापैकी कोणालाही ते आवडणार नाही.” “आता ही एक नम्रपणे विनंती आहे की, जर तुम्हाला असे व्हिडिओ ऑनलाइन दिसले, तर कृपया ते पुढे पाठवू नका किंवा शेअर करू नका. आणि आमच्या मीडियामधील मित्रांना ज्यांनी हे व्हिडिओ आणि फोटो प्रसारित केले आहेत, मी तुम्हाला विनंती करतो की, ते तातडीने काढून टाका,” असे आवाहन देखील सोशल मीडियाद्वारे केले आहे. आलिया आणि रणबीरच्या घराची झलक दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून आलिया आणि रणबीर यांच्या नव्या घराचं काम सुरु होतं. दोघांचं या घराशी वैयक्तिक नातं आहे कारण ते घर कपूर कुटुंबाचा वारसा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीरच्या घरातील एक झलक दाखवली होती. सहा मजली असलेले हे घर समुद्रकिनारी आहे. याची झलक पाहताच व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला होता. Alia Bhat | हेही वाचा: चिमूरडीचा पहिलाच वाढदिवस ठरला शेवटचा; विरारमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू