“…तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही”; बीड लोकसभेत बोगस मतदान केल्याचा रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar| लोकसभा निवडणूकीचे आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता राज्यातील 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यातच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. बीड लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदानावेळी पैसे वाटल्याच्या घटना समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी बीडच्या परळी येथील एका मतदान केंद्रातील व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हीडिओत एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राजवळ उभे असलेल्या मतदाराला एक व्यक्ती सूचना देताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती मतदारांना कोणते बटन दाबा, हे सांगताना दिसत आहे. यावर रांगेत उभे असलेले इतर मतदार ज्याचे मतदान त्यांना करु द्या, असे सांगत आहेत. मात्र, तरीही मतदारांना सूचना देणारी व्यक्ती तिथेच उभे राहून मतदारांना सूचना देताना दिसत आहे. यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार ट्वीट Rohit Pawar|
“बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे?, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे.म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर… pic.twitter.com/MtgzFGwBqn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 18, 2024
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात बीडमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. बीड लोकसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे रिंगणात आहेत.
बारामतीत पैसे वाटप झाल्याचा आरोप Rohit Pawar|
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या दिवशी अजित पवार गटाने पैसेवाटप केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांनी बारामतीत पैसे वाटप सुरु असतानाचे काही व्हीडिओ शेअर केले होते. याशिवाय, मतदानाच्या दिवशी पहाटेपर्यंत वेल्हा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी होती, याचाही व्हीडिओ रोहित पवारांनी शेअर केला होता.
हेही वाचा:





