‘…तर मी राजकारण सोडून देईन’; सुधाकर बडगुजरांचा थेट ठाकरे गटाला इशारा

Shivsena UBT Politics : नाशिकमधील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे उपनेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले कि, पक्षावर नाराजी व्यक्त कारणं किंवा मुख्यमंत्र्याना भेटल्यावरून जर अशी कारवाई होत असेल तर मला वाटतं हे चुकीची आहे.
त्यानंतर, आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली नाही, लोकांना विचारुन निर्णय घेईल. पण, भाजपच्या नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, तो एवढा थयथयाट का केला, असा खोचक सवालही बडगुजर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, शिवसेना नेतृत्वाला देखील चॅलेंज केलं आहे. “जर मी संघटनेविरोधात काही काम केलं असेल, तर मी राजकारण सोडून देईन!” असं त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलं.
समर्थकांची पाठराखण, ‘बडगुजर यांचा निर्णय मान्य!’
दरम्यान, नाशिकमधील संपर्क कार्यालयाबाहेर समर्थकांकडून गर्दी करण्यात आली आहे. तसेच, जो काही निर्णय सुधाकर बडगुजर यांनी घेतला, तो आम्हाला मान्य असेल असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाभर मोठी कामगिरी केली आहे. मात्र, पक्षाकडून ही चुकीची कारवाई केल्याचं मत बडगुजर यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बिनचूक हकालपट्टीवर बडगुजरांचा संताप
बडगुजर यांनी स्पष्ट केलं की, “मी नाशिकबाहेर नियोजित दौऱ्यावर होतो, त्यामुळे पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकलो नाही. मी ही माहिती पक्षाला आधीच दिली होती.” पण तरीही मला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. “पक्षात खरे बोलणं जर गुन्हा असेल, तर मी तो केला आहे,” असं ठणकावत त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांची भेट – कारण की गुन्हा?
बडगुजर पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागरिकांच्या प्रश्नांसाठी भेट घेतली होती. त्यामुळे जर वादळ उठत असेल, तर हे हास्यास्पद आहे.” तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यासोबत झालेली मेसेजिंग संवादही पत्रकारांसमोर दाखवत सांगितलं की, “गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो घेतल्यावरही कारवाई झाली, पण त्यावेळी अरविंद सावंतही उपस्थित होते. मग फक्त माझ्यावरच कारवाई का?





