Ram Temple donation theft : सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली स्वतंत्र एसआयटी स्थापन करा; राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी कॉंग्रेसची मागणी
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी (Ram Temple donation theft) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली.

Ram Temple donation theft : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी (Ram Temple donation theft) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली. जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, चोरी कधीही लपून राहत नाही. उशिरा का होईना, ती समोर येतेच. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन देशासाठी अत्यंत चिंताजनक आहे. ज्यांनी लोकांच्या श्रद्धेशी प्रतारणा केली आहे, त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे.
जयराम रमेश म्हणाले, हे प्रकरण आता केवळ चोरीपुरते (Ram Temple donation theft) मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणी दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या असून पहिली जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी आणि दुसरी सर्वोच्च न्यायालयाला अंधारात ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. योगी सरकारने २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, पहिले पथक कोणतीही चौकशी करत नाही.
तरीही, ४ ऑगस्ट रोजी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्याच पथकाने केलेल्या प्राथमिक तपासाचा (Ram Temple donation theft) उल्लेख कसा केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर कोणतीही चौकशी झालीच नव्हती, तर मग कोणत्या अंतरिम अहवालाच्या आधारे ट्रस्टने ६ जुलै रोजी चंपत राय यांना क्लीन चिट दिली? तसेच या प्रकरणात आयजी किरण एस यांच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.






