शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपावर चोरी; चार कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल

निमोणे – शिरुर तालुक्यातील निमोणे-गुनाट रोडवरील परफेक्ट एच.पी. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळून 94 हजार 520 रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजेश्री अनिल काळे (वय 43, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना दि. 21 जुलै 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरीस गेलेली रक्कम ही पेट्रोल पंपावरील दैनंदिन कलेक्शन आणि उचल म्हणून ठेवलेली रोख रक्कम होती. आरोपींनी ही रक्कम चोरून पळ काढला.
या प्रकरणी रामेश्वर हरिशचंद्र गर्गोंड (रा. खबरा, थाना देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश), रमन सिताराम ठाकूर (रा. मदनपुर बरेली, नरसिंगपूर, मध्यप्रदेश), आकाश विक्रम ठाकूर (रा. सहजपुर ऊटकटा, जि. सागर, मध्यप्रदेश) आणि सोनू ठाकूर (पूर्ण नाव अज्ञात, रा. हाथीडोल, नमाखेडा, थाना देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.





