Rahul Gandhi : “युवक देशाची सर्वांत मोठी ताकद” – राहुल गांधी
तुम्ही देशाची ताकद, देशाचा अभिमान आहात. ही भावना मी प्रत्येक नागरिकाविषयी व्यक्त करत आहे, असे म्हणत त्यांनी प्रामुख्याने शिक्षण, रोजगार हे मुद्दे मांडले.

Rahul Gandhi – भारतात सुमारे ४० कोटी युवक आहेत. ते देशाची सर्वांत मोठी ताकद आहेत. अमेरिका, चीन आणि रशियाविषयी भरपूर चर्चा होते. मात्र, भारतीय युवकांची क्षमता संपूर्ण जगात अतुलनीय स्वरूपाची आहे, असे भाष्य कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केले.
देशातील तरूणाईपर्यंत पोहचण्यासाठी कॉंग्रेसने ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या कार्यक्रमांतर्गत राहुल यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये तरूणाईशी संवाद साधला.
तुम्ही देशाची ताकद, देशाचा अभिमान आहात. ही भावना मी प्रत्येक नागरिकाविषयी व्यक्त करत आहे, असे म्हणत त्यांनी प्रामुख्याने शिक्षण, रोजगार हे मुद्दे मांडले.
रोजगार मिळवून देऊ शकत नसल्याने आज शैक्षणिक प्रमाणपत्रांना काहीच महत्व उरलेले नाही. देशातील रोजगाराचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. देशातील उत्पादन घटले आहे. कर्ज मिळवताना अडचणी येत आहेत.
पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नोकऱ्यांची जागा घेत आहे. त्यामुळे युवकांच्या संधी हिरावल्या जात आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. संबंधित कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक, विद्यार्थी सहभागी झाले.






